Sangli News| कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा

वृत्तपत्र विक्रेत्यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाद्वारे मागणी
Sangli News
सांगली : राज्य वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने येथे शुक्रवारी मोर्चा काढून निदर्शने केली.
Published on: 
Updated on: 

सांगली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर केलेले स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या आदेशानुसार सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

याबाबत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्णय होऊनही अंमलबजावणीअभावी विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च २०२६ रोजी आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर माहिती व जनसंपर्कमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी, पुढील अधिवेशनापूर्वी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा काढला.

चार प्रमुख मागण्यांवर भर

महामंडळाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शासनाने तातडीने आदेश काढावेत, महामंडळाच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा व निवृत्ती वेतन योजना सुरू कराव्यात, तसेच राज्यातील अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करावी.

हा मोर्चा विकास सूर्यवंशी (राज्य सरचिटणीस), सचिन चोपडे (राज्य कार्यकारिणी सदस्य), दत्तात्रय सरगर (जिल्हाध्यक्ष), विशाल रासनकर (जिल्हा सचिव), मारुती नवलाई (माजी राज्य कार्यकारिणी सदस्य), बाळासाहेब पाटील (कुपवाड अध्यक्ष), नंदकुमार पोवाडे (मिरज अध्यक्ष), सागर घोरपडे (सांगली अध्यक्ष), दीपक वाघमारे (महापालिका क्षेत्राध्यक्ष), प्रशांत जगताप (माजी जिल्हाध्यक्ष), जिल्हा कार्याध्यक्ष दरिबा बंडगर शिवाजी जाधव (ग्रामीण जिल्हाध्यक्ष) महारुद्र कुंभार (जिल्हा उपाध्यक्ष), चंद्रकांत जोशी (जिल्हा सचिव), हणमंत जाधव (प्रसिद्धीप्रमुख), धनंजय राजहंस (वाळवा अध्यक्ष), स्वाभिमानी क्रांतिकारी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक विनय भंडारी, कार्याध्यक्ष यशवंत कदम, अजित माने, सोहम भंडारी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

मोर्चामध्ये माजी शहराध्यक्ष नारायण माळी, बजरंग यमगर, नागेश कोरे, संघटनेचे पदाधिकारी कृष्णा जामदार, बाळासाहेब पोरे, सचिन माळी, प्रशांत साळुंखे प्रदीप आजगावकर, दीपक सूर्यवंशी, श्रीकांत दुधाळ बसाप्पा पट्टणशेट्टी, सुरेश गायकवाड, बंदेनवाज मुल्ला, सुरेश कांबळे, संजय कांबळे, आर. एस. माने, संतोष वणकुद्रे, नीलेश कोष्टी, धनाजी मोरे, सिकंदर शेख, यशवंत जाधव, महादेव कावळे, श्रीपती रासनकर, मच्छिंद्र रासनकर, जावेद शेख, प्रथमेश मोरे दादासोा गुरव, महेश वैद्य, सुनील कट्टप्पा, पोपट मंडले, दीपक शमाने, पिंटू पाटील, चिंतामणी मालाडकर, राजेंद्र पोटे, महेश पिसे, दीपक शिंदे, रवी गोखले, सुरेश घोडके, राजेंद्र पाटील, राजेंद्र कुंभार, कमलाकर भांबुरे, दादासोा मुजावर, राजकुमार कोळी, नबिलाल तांबोळी आदी सहभागीझाले होेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news