Sangli News | ...अन्यथा धुराडे पेटू देणार नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा इशारा; आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Sangli News | ...अन्यथा धुराडे पेटू देणार नाही
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी 3500 रुपये दर जाहीर केला. हे संघटनेच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच झाले आहे. उर्वरित साखर कारखान्यानी तत्काळ दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, गाड्या अडवू, पेटवू, कारखाने बंद पाडू, दर जाहीर केल्याशिवाय धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी 12 नोव्हेंबरची मुदत मागून घेतली होती. त्याची मुदत बुधवारी संपली. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पढाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेतली. यावेळी संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांद्रे, भरत चौगुले उपस्थित होते.

खराडे म्हणाले, 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी 12 नोव्हेंबर रोजी दर जाहीर करू, असे कारखानदारांनी जाहीर केले होते. त्यानुसार क्रांती कारखान्याने 3500 रुपये जाहीर केले. आमच्या मागणी नुसार त्यांनी एफआरपीपेक्षा 133 रुपये ज्यादा दर जाहीर केला. सोनहिरा कारखान्याने एफ आर पेक्षा 33 रुपये ज्यादा म्हणजे 3500 रुपये जाहीर केला आहे. त्यांनी आणखी 67 रुपये जाहीर करावेत. दालमिया कारखान्याने त्याच्या एफ आर पी एवढाच 3537 रुपये दर जाहीर केला आहे. त्यांनी आणखी 100 रुपये जाहीर करावेत अशी मागणी आहे.

संदीप राजोबा, यावेळी रावसाहेब पाटील बाळासाहेब जाधव प्रताप पाटील सुधाकर पाटील बाळासाहेब लिंबेकाई रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news