Sangli Crime : रिल्सच्या आमिषाने महिलेचा विनयभंग

कवठेमहांकाळ शहरातील घटना ः बनेवाडीच्या तरुणाला जमावाचा चोप
Sangli Crime News
रिल्सच्या आमिषाने महिलेचा विनयभंग
Published on
Updated on

कवठेमहांकाळ ः फुकटात रिल्स बनवून देण्याच्या आमिषाने कवठेमहांकाळ शहरातील नवीन बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये महिलेचा विनयभंग करुन, जातीवाचक शिवीगाळ आणि दगडफेक करणाऱ्या शहाजी संभाजी माळी (रा. बनेवाडी, ता. कवठेमहांकाळ) याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही घटना शुक्रवार, दि. 29 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात शहाजी माळी याच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानक परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आली होती. यावेळी शहाजी माळी तेथे आला. त्याने ‌‘मी तुला फुकटात रिल्स काढून देतो‌’, असे सांगत संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी महिलेने आरडाओरड करताच हॉटेलमधील ग्राहक आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. महिलेच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहाजी याला पकडून बेदम चोप दिला. मारहाणीच्या गोंधळात शहाजी याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून महिलेच्या पाठीवर आणि हातावर हल्ला करीत तिला जखमी केले. या झटापटीदरम्यान महिलेचे पैशांचे पाकीटही हरवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव

घेतली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार शहाजी माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील व अंमलदार डी. डी. पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news