Sangli News : म्हैसाळ कालव्यात पडून महिलेचा मृत्यू

कवठेमहांकाळ तालुक्यातील जाधववाडी येथील घटना
Sangli News
म्हैसाळ कालव्यात पडून महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : जाधववाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील रुक्मिणी अशोक निकम (वय ५५) यांचा सोमवारी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या रुक्मिणी निकम यांचा पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली.

रुक्मिणी निकम या सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गावाजवळील म्हैसाळ योजनेच्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक तोल जाऊन त्या कालव्याच्या पाण्यात पडल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा रमेश निकम याने तातडीने धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना लगेचच कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news