

सांगली : पोलिस दलातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सात अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, तर संजयनगर पोलिस ठाण्याचे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. बदलून दिलेल्या ठिकाणी तातडीने हजर होण्याच्या सूचना आहेत.
वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक योगेश शेलार, समाधान धुगे, निवास मोरे, नितीन बाबर आणि कुमार पाटील यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर (जिल्हा विशेष शाखा), संतोष पवार (मानवी संसाधन शाखा), सहायक पोलिस निरीक्षक रणजित तिप्पे (वाहतूक शाखा, मिरज), सुनील गिड्डे (संजयनगर), विभावरी रेळेकर (ईश्वरपूर), विक्रांत संकपाळ (डायल ११२), तबस्सुम मगदुम (महिला कक्ष), किशोरकुमार खाडे (सांगली शहर), पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव (विटा), पूजा येळेकर (आष्टा), राजू केंदे (तासगाव), पांडुरंग मुंडे (महात्मा गांधी चौकी), सुजाता भोपळे (संजयनगर), जीवन कांबळे (संजयनगर), संतोष यादव (दंगल नियंत्रण पथक), बाबासाहेब बदने (वाचक, विटा उपविभाग), विश्र्वंभर पोटे (कवठेमहांकाळ), वैभव पाटील (मिरज ग्रामीण), प्रियांका माने (तासगाव), प्रणोती यादव (पैरवी कक्ष, सांगली), संग्राम पाटील (सीसीटीएनएस कक्ष), विठ्ठल मणीकेरी (सायबर पोलिस ठाणे), एकनाथ पाटील (सांगली शहर), अशा बदल्या केल्या आहेत.