Sangli News : महापालिका घरपट्टीच्या दंडामध्ये सवलत जाहीर

महापौर धीरज सूर्यवंशी; अभय योजना जाहीर
Sangli Municipal Corporation |
Sangli Municipal Corporation |File Photo
Published on
Updated on

सांगली : महापालिकेने थकीत व नियमित घरपट्टीचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी 'महापौर अभय योजना' लागू केली आहे, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिली. तसेच शहरातील शाळा, मंदिरे, तालीम व व्यायामशाळांच्या घरपट्टीबाबत येत्या महासभेत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

महापौर म्हणाले की, ३१ जुलैपर्यंत थकीत घरपट्टीचा भरणा केल्यास दंडात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान ७५ टक्के, तर १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत घरपट्टी भरल्यास ५० टक्के सवलत मिळणार आहे. थकबाकीदारांबरोबरच नियमित घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांनाही दिलासा देण्यात आला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत चालू वर्षाची घरपट्टी भरल्यास १० टक्के, तर ३० सप्टेंबरपर्यंत कर भरणा केल्यास ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. महापालिकेने घरपट्टीत कोणतीही वाढ केलेली नसून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे, तसा निर्णय शासनस्तरावरच झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news