

विठ्ठल नलवडे
शिराळा : शिवणी धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. शेतीसाठी पाण्याचा पुरवठा ठप्प झाल्याने ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.अनेक माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
शिवणी धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्यामुळे कालव्यांना पाणी सोडणे अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी शिराळा, खेड व शिवणी परिसरातील शेतजमिनी कोरड्या पडत आहेत. या कालव्यांचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.