

शिराळा शहर : उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्यजिवांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचेही हाल होत असून साप, घोरपड, सरडे आदी प्राणी मोठ्या प्रमाणात शेताच्या बांधावर, पाणवठ्याच्या परिसरात तसेच मानवी वस्तीजवळ दिसू लागले आहेत.
जंगलातील छोटे ओढे, झरे आणि नैसर्गिक पाणीसाठे आटू लागले आहेत. त्यामुळे पाण्याच्या आणि थंडाव्याच्या शोधात हे प्राणी शेताकडे वळतात, असे अभ्यासकांनी सांगितले. काही गावांत नाग, धामण, घोणस यांसारखे साप दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.