Sangli Crime: सांगली कारागृहातून कैदी पळाला

तटबंदीवरून खंदकात उडी घेतली : प्रशासनाची तारांबळ; शोध सुरू
Sangli Crime: सांगली कारागृहातून कैदी पळाला
Pudhari
Published on
Updated on

सांगली : मिरज येथील कुणाल वाली याच्या खुनातील संशयित अजय डेव्हिड भोसले (वय 35, रा. मिरज) याने कारागृहातील तटबंदीवरून खंदकात उडी घेत पलायन केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला. दरम्यान, यामुळे कारागृह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. तत्काळ कारागृह पोलिस आणि सांगली शहर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. परंतु सायंकाळपर्यंत भोसले सापडला नाही. त्यामुळे रात्री उशिरा त्याच्या पलायनाबाबत गुन्हा दाखल केला.

कारागृहाच्या पूर्वेकडील बाजूस तटबंदीजवळील गवत काढत असताना भोसले याने तटबंदीवर चढून खंदकात उडी मारली. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तसेच टॉवरवरील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे कारागृहात धावपळ उडाली. सर्वजण मुख्य दरवाजाकडे धावले. तेथून बाहेर पळत म. के. आठवले विनय मंदिर शाळेसमोर आले. तोपर्यंत भोसले याने खंदकात उडी घेतली होती व अंगावरील शर्ट तसेच चप्पल फेकून दिली होती. तो आठवले विनय मंदिर शाळेसमोरून पळत गेल्याचे चौकशीत समजले. त्यामुळे तत्काळ वेगवेगळ्या दिशेने पोलिस पथके त्याच्या मागावर रवाना झाली. बसस्थानक, रेल्वे स्थानकाकडे पोलिस धावले. सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी देखील शोधमोहीम राबवली. कारागृह परिसरात तो कोठे तरी लपला असल्याच्या शक्यतेने तेथेही शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा समजू शकला नव्हता.

रात्री उशिरा कारागृहातील पोलिस कर्मचारी हणमंत पाटणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार भोसले याच्याविरुद्ध कारागृहातून पलायन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news