Sangli News : सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रलंबित भत्ते, बिलासाठी बस स्थानकासमोर घंटानाद, महाआरती
ST Employee Protest
सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Published on
Updated on

सांगली : प्रलंबित भत्ते व वैद्यकीय बिलांच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सांगली विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले.

याबाबत विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांपासून वैद्यकीय बिले, कोविड भत्ता, शिलाई भत्ता, हजेरी प्रोत्साहन भत्ता, यांसारख्या हक्काच्या रकमा प्रलंबित आहेत. यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. संघटनेने २९ मे रोजी विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने घंटानाद, महाआरतीनंतर सांगली बसस्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. यामध्ये सांगली विभागातील विविध आगार व युनिटमधील दोनशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी कामगार नेते, संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत म्हणाले, कामगारांच्या हक्काच्या पैशांसाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र इतर कामांसाठी निधी उपलब्ध होतो. ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाने कामगारांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल. यावेळी विभागीय सचिव जयदीप पाटील, कार्याध्यक्ष नारायण सूर्यवंशी, संघटक सचिव मनोज पाटील, महिला राज्य उपाध्यक्ष शबाना मुलानी, धनंजय पाटील, अभिजित राजपूत, गंगाराम रुपणवर, राजेश पवार यांच्यासह विविध आगारांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news