Sangli News : बेडग येथे विहिरीत आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह

१ जूनपासून होत्या बेपत्ता
Sangli News
बेडग येथे विहिरीत आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह
Published on
Updated on

बेडग : येथील जैन गल्ली परिसरातील सुमित्रा बाबुराव शिरोटे (वय ८०) या एक जूनपासून बेपत्ता होत्या. तशी नोंद दोन जूनरोजी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली होती. गुरुवारी (दि. ११) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोटार बंद करण्यासाठी विहिरीवर गेली असता विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. मिरज ग्रामीण पोलिस आणि बेडगचे पोलिस पाटील यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून आवश्यक पंचनामा व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या मोहिमेत कमांडर कैलास वडर यांच्यासह महेश गव्हाणे, सागर जाधव, आसिफ मकानदार, शिवराज टाकळी, आकाश कोलप, ईर्शाद कवठेकर, सदाशिव बेडेकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news