Sangli Dance Bar : बारबालांवर लाखो रुपयांची उधळण

डान्सबारमुळे काही पोलिस अंमलदारांच्या अडचणीत वाढ; बारला नव्हती फायरसेफ्टी
Dance Bar
Dance BarPudhari
Published on
Updated on

मिरज : म्हैसाळ-नरवाड (ता. मिरज) येथील राही पॅलेस बारमधील डान्सबार हा हायप्रोफायईल डान्सबार असल्याचे आता समोर आले आहे. या डान्सबारमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून एका तासासाठी चार हजार रुपये एन्ट्री फी घेतली जात होती. तसेच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना बारबालांकडून हायप्रोफाईल सेवा दिली जात असल्याने त्यांच्यावर लाखो रुपयांची उधळण केली जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

दरम्यान, राही पॅलेस बारमध्ये विनापरवाना डान्सबार सुरू केल्याने बारच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या डान्सबारप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडील काही पोलिस अंमलदारांच्या अडचणीतही वाढ झाली असून ते चौकशीच्या फेऱ्यात येणार असल्याची चर्चा खात्यात सुरू आहे.

कोल्हापूरमधून हायप्रोफाईल बारबाला आणून त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रात सेवा दिली जात आहे. या हायप्रोफाईल बारबाला राही पॅलेस बारमध्ये आणण्यात आल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मिरज पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. परंतु या ठिकाणी डान्सबार सुरू होणार असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडील काही पोलिस अंमलदारांना होती. त्यांनी याची कल्पना वरिष्ठांना दिली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित अंमलदार आता वरिष्ठांच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राही पॅलेस बार हा काही महिन्यांपूर्वी सुरू झाला आहे. याठिकाणी पूर्वी ओम गार्डन नावाने बार सुरू होता. परंतु या बारची विक्री केल्यानंतर या ठिकाणी डान्सबार सुरू झाला होता. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी डीजेच्या तालावर अर्धनग्न अवस्थेत छमछम चालत होती. यासाठी कोल्हापूरमधील अश्लील नृत्य करणाऱ्या बारबाला पुरवणाऱ्या एजंटाला मोठी रक्कम दिल्याचीही चर्चा आहे. तसेच या डान्सबारमध्ये एन्ट्रीसाठी ग्राहकांकडून चार हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात होती. त्यानंतर बारबालांकडून हायप्रोफाईल सेवा करून घ्यायची असल्यास जादा रक्कम ग्राहकांकडून उकळली जात होती. रकमेनुसार बारबालांकडून सेवा दिली जात होती.

दरम्यान, प्रत्येक बारमध्ये फायरसेफ्टी असणे आवश्यक आहे. राही पॅलेस बार हा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असला, तरी त्यासाठी फायरसेफ्टी ही अग्निशमन दलाकडूनच घ्यावी लागते. परंतु या राही पॅलेस बारला अग्निशमन दलाने फायरसेफ्टी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.

रंगाचा बेरंग...

पोलिसांचा छापा पडला त्यावेळी नुकतीच राही पॅलेसमधील डान्सबारला सुरुवात झाली होती. अश्लीलता निम्म्यावर पोहोचली होती. मध्यधुंद ग्राहकांसमोर अर्धनग्न अवस्थेत बारबालांनी नृत्य सुरू केले होते. डाव रंगात येऊ लागला होता, तोच पोलिसांचा छापा पडला. त्यामुळे शौकिनांच्या रंगाचा बेरंग झाला.

लाखोंची मलई?

राही पॅलेस ब डान्सबार सुरू करण्यासाठी वर्दीला लाखोंची मलई दिल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु याची भनक वरिष्ठांना नव्हती का? कोणाच्या आदेशाने कोल्हापुरातून बारबाला आणून डान्सबार सुरू केला? यामध्ये कोणा-कोणाचे हात ओले झाले? ते सर्वजण आता चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news