Sangli Accident : एरंडोली येथे टेम्पोच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

एक गंभीर; जमावाकडून वाहनाची तोडफोड
Accident
Accident
Published on
Updated on

सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथे आंबा भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. गुरुवार, दि. १८ रोजी सायंकाळी ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टेम्पो चालकाला पकडून वाहनाच्या काचा फोडत संताप व्यक्त केला.

अण्णासाहेब खाजवली मिरजकर (वय ३७, रा. लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), लक्ष्मण संतू हाक्के (वय ६०, रा. एरंडोली, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. तर रामचंद्र सीताराम नलवडे (वय ३८, रा. एरंडोली) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पो मिरजच्या दिशेने वेगाने जात होता. एरंडोली हद्दीत दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने काही अंतरावर वाहन अडवून चालकाला पकडले. जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

टेम्पो चालक इरिया रुद्रया गणाचार्य (वय २२) आणि त्याचा साथीदार आप्पासाहेब भास्कर नदाफ (२१, दोघे रा. हिरे पडसलगी, ता. जमखंडी, जि. बेळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news