Sangli Crime : सांगलीत कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संशयिताला अटक; अश्लील चित्रफीत बनविल्याचे उघड
Sangli Crime News
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार Pudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : येथील विश्रामबाग परिसरातील आलदर चौकातील ‘बिलेनियर’ कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील चित्रफीत बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पुन्हा नकार दिल्यानंतर चित्रफीत व्हायरल केली. त्यामुळे पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात संशयित समर्थ अनिल देवकुळे (रा. रविवार पेठ, माधवनगर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

शहरातील या पीडितेबरोबर समर्थ याने ओळख वाढवली. जानेवारी २०२६ मध्ये त्याने या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलावले. कॅफेमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडितेशी लगट केली. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर, हा प्रकार कोणाला सांगितलास तर चित्रफीत ‘व्हायरल’ करेन, अशी धमकी दिली.

बलात्कारानंतर त्याने पीडितेला पुन्हा भेटायला बोलावले. परंतु, तिने नकार दिल्यानंतर त्याने तिची चित्रफीत व्हायरल केली. हा प्रकार समजताच पीडितेने आईला सांगितले. आईने तिला घेऊन विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव तपास करत आहेत.

विश्रामबागला पुन्हा प्रकार

विश्रामबाग परिसरात काही दिवसांपूर्वी एका युवतीस शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्कार केल्याचा प्रकार ‘हँग ऑन’ कॅफेमध्ये घडला होता. तेव्हा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या कॅफेसह अन्य कॅफेंची तोडफोड केली होती. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन, शहरातील कॅफेमधील कंपार्टमेंट तोडून टाकली होती. तसेच कॅफेसाठी पारदर्शक अशी नियमावलीही बनवली. परंतु, त्यानंतरही शहरातील अनेक कॅफेमध्ये अश्लील चाळ्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा या घटनेमुळे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news