Sangli Drowning Case : विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

वाळेखिंडी-लोणारवाडी येथील घटना
Sangli Drowning Case
विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
Published on
Updated on

जत : तालुक्यातील वाळेखिंडी-लोणारवाडी येथे रविवारी सकाळी विहिरीत पोहोत असताना सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. हर्षद दत्तात्रय हिप्परकर (वय 13, रा. वाळेखिंडी, ता. जत) असे मुलाचे नाव आहे.

हर्षद हा दररोज वडील व भावासोबत शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी जात होता. रविवारी सकाळी हर्षद विहिरीत पोहोत असताना अचानक दम लागल्याने तो खोल पाण्यात बुडाला. मुलगा बाहेर न आल्याचे समजताच काठावर असणाऱ्या वडिलांनी त्याला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु विहिरीत सुमारे 45 फूट पाणी असल्याने त्यास वाचवण्यास आणि वर काढण्यात अडचण आली. तोपर्यंत शेजारचे लोकदेखील जमा झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जत पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे यांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सला कळविले. माहिती मिळताच पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गव्हाणे, सागर जाधव व आसिफ मकानदार यांनी बचाव व शोध मोहीम राबविली. खोल पाण्यात शोध घेत काही मिनिटांत हर्षदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news