Sangli News : करुंगली-गुंडगेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

दरड कोसळल्यामुळे हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
Sangli News
करुंगली-गुंडगेवाडी रस्त्यावर दरड कोसळली
Published on
Updated on

वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार अतिवृष्टी होत आहे. या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील करुंगली ते गुंडगेवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी मोठी दरड कोसळली. यामुळे येथील वाड्यावस्त्यांवरील नागरिक आणि पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.

बुधवारी अतिवृष्टीमुळे या मार्गावरील महादेव टोंगी आणि खिंडीमध्ये अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी डोंगराचा भाग रस्त्यावर आला. दरड कोसळल्यामुळे हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावरील खिंडीमध्ये अजूनही काही धोकादायक दगड लटकत असून, ते कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, रस्त्यावरील दरड हटवून मार्ग खुला करावा आणि खिंडीतील धोकादायक दगड काढून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.

गेल्यावर्षी पूल कोसळला, यंदा दरडीचे संकट

करुंगली-गुंडगेवाडी मार्गावर गेल्या वर्षी वारणा कालव्यावरील पूल कोसळला होता. आता मुख्य मार्गावरच दोन ठिकाणी दरड कोसळल्याने साकव पुलापर्यंत पोहोचणेही अशक्य झाले असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news