Sangli News : विजेच्या धक्क्याने न्यायाधीश तुकाराम मोटे यांचा मृत्यू, कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना

उसाच्या फडाला आग लागल्यानंतर दुर्घटना
Sangli News : विजेच्या धक्क्याने न्यायाधीश तुकाराम मोटे यांचा मृत्यू, कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना
Published on: 
Updated on: 

कवठेमहांकाळ : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या एका न्यायाधीशाचा शेतात वीजप्रवाह उतरल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे घडली. तुकाराम पतंग मोटे (४२, रा. हरोली, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे मृत न्यायाधीशाचे नाव आहे.

ते वसई येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशपदावर कार्यरत होते. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने देशिंगसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देशिंग येथे तुकाराम मोटे आणि आप्पासाहेब कोळेकर यांची लगतच ऊस शेती आहे. रविवारी दुपारी या शेतातील उसाला आग लागल्याची माहिती मिळताच मोटे हे ती पाहण्यासाठी शेतात गेले होते.

या दरम्यान, शेतात तुटून पडलेल्या ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या आगीत सुमारे दोन हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.