Sangli Missing Case : माडग्याळ येथे अल्पवयीन मुलीसह आई बेपत्ता

शेतात जात असल्याचे सांगून घर सोडले
Girl Missing Case
Girl Missing CasePudhari
Published on
Updated on

जत : माडग्याळ (ता. जत) येथील परीट वस्ती परिसरातून एक महिला आणि तिची 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत परमात्मा ननवरे (वय 40,रा. परीट वस्ती, माडग्याळ) यांनी यासंदर्भात पोलिसांत खबर दिली आहे. फिर्यादी चंद्रकांत ननवरे यांची पत्नी प्रतिभा चंद्रकांत ननवरे (वय 34) व मुलगी प्रणाली चंद्रकांत ननवरे (वय 14) या 26 मे रोजी सकाळी सव्वाआठ वाजता ‌‘शेतात जेवणाचा डबा घेऊन जाते‌’ असे सांगून गेल्या होत्या. मात्र, दुपार उलटून गेली तरी त्या परतल्या नाहीत. नातेवाईकांनी माडग्याळ परिसरासह सर्व संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही दोघांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, माय-लेकींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news