Sangli Crime : नशेचे इंजेक्शन प्रकरणातील चौथा संशयित फरार

संशयितांनी अनेक वेळा केली नशेच्या इंजेक्शनची खरेदी : सर्व व्यवहार ऑनलाइन
Narcotic Injection
नशेची इंजेक्शन
Published on
Updated on

तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथील मेफेन्टरमाईन सल्फेट या अमली इंजेक्शनच्या अवैध साठ्याप्रकरणी अटकेत रेवण गायकवाड (रा. खुजगाव, ता. तासगाव) या चौथ्या संशयिताचे नाव समोर आले आहे. तो घटनेपासून फरार आहे. त्याच्या अटकेनंतर या रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी वर्तविली.

बलगवडे येथे मांजर्डे रस्त्यावरील संशयित नागेश औताडे याच्या पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी 20 मे रोजी रात्री उशिरा छापा टाकून 37 हजार रुपये किमतीचा अमली इंजेक्शनचा साठा जप्त केला. नागेशला मदत करणारा त्याचा मित्र समीर अमजद मुलाणी (रा. बलगवडे) यालाही अटक केली होती.

संशयित नागेश आणि समीर यांच्या पोलिस चौकशीत सागर गवळी (रा. मानखुर्द, मुंबई) हा त्यांना इंजेक्शन पुरवत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सागर यास सातारा येथून ताब्यात घेतले. मात्र, या कारवाईची माहिती मिळताच रेवण गायकवाड फरार झाला. त्यानेच नागेश आणि समीर या दोघांना नशेची औषधे कुठे मिळतात, याची माहिती पुरवल्याची चर्चा आहे. रेवणने दिलेल्या माहितीच्या आधारे नागेश आणि समीर यांनी मुंबईतील सागर गवळीकडून ही इंजेक्शन्स मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे व्यवहार ऑनलाईन होते. नागेश व समीर यांनी या इंजेक्शनची विक्री अनेकांना केल्याचे समजते. नागेश, समीर व रेवण हे एका जिममुळे एकत्र होते. तेथेच त्यांनी या अमली इंजेक्शन्सबाबत माहिती दिल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news