Hutatma Sugar Factory : ‘हुतात्मा’च्या सभासदांना महिन्याला १५ किलो साखर

गौरव नायकवडी; वाळव्यात साखर वितरण केंद्राचे उद्‌घाटन
Hutatma Sugar Factory
वाळवा : येथे ‘हुतात्मा’च्या सभासदांसाठी साखर वितरण दुकानाचे उद्‌घाटन केदार नायकवडी, गौरव नायकवडी, कुमार शिंदे, पोपट अहिर, महादेव पाटील आदींच्या उपस्थितीत झाले.
Published on
Updated on

वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासद शेतकर्‍यांना दरमहा १५ किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी यांनी दिली.

यापूर्वी हुतात्मा बझारच्यावतीने या साखरेची विक्री केली जात होती. मात्र, नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर कारखान्याने सभासद साखर विक्री दुकान ताब्यात घेऊन नव्या व्यवस्थापनाखाली ही विक्री सुरू केली आहे. याआधी कारखान्याने पेट्रोल पंपही ताब्यात घेऊन स्वतःची विक्री व्यवस्था सुरू केली आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक गौरव नायकवडी, केदार नायकवडी, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील व सर्व संचालकांच्या हस्ते या साखर विक्रीचा प्रारंभ केला. याप्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, सरपंच संदेश कांबळे, सचिव मुकेश पवार, पोपट अहिर, भीमराव अहिर, बाळासाहेब पाटील, वसंत वाजे, अशोक खोत, बाजीराव नायकवडी, अजित घोरपडे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news