Sangli Accident : कवठेएकंदजवळ अपघातात पतीचा मृत्यू

पत्नी गंभीर जखमी : मोटारीची दुचाकीस धडक : अपघातानंतर चालक पसार
Accident
Accident
Published on
Updated on

तासगाव : तासगाव-सांगली रस्त्यावर कवठे एकंद गावाजवळ मोपेडवरून निघालेल्या वृध्द दाम्पत्यास मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. रसूल मौला शेख (वय ७०, रा. कवठे एकंद, ता. तासगाव) असे मृत वृद्धाचे नाव असून, शहनाज रसूल शेख (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तैसीफ अशोक शेख (रा. कवठे एकंद) यांचे चुलते रसूल शेख व चुलती शहनाज शेख हे दोघे बुधवारी दुपारी आपल्या मोपेडवरून (क्र. एमएच १० सीजे २६४१) तासगावहून कवठे एकंद येथील घराकडे येत होते. ते सिझन कोल्ड स्टोरेजसमोर आले असता, पाठीमागून वेगाने आलेल्या एका मोटारीने (क्र. एमएच ०९ जीए ४३८३) त्यांच्या मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी मृत रसूल शेख यांचे पुतणे तैसीफ शेख यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news