Miraj News : मिरजेतील विजयनगरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच नर्तिकांसह दहा जण ताब्यात
Rave Party Raid
मिरजेतील विजयनगरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा mediaphotos
Published on
Updated on

मिरज : विजयनगर (म्हैसाळ) येथील राही हॉटेलवर पोलिसांचा सोमवारी मध्यरात्री धडक छापा पडल्याने परिसरात खळबळ उडाली. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या मद्य पार्टीतून पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पाच तरुणी आणि पाच तरुणांना ताब्यात घेतले.

मिरजचे पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांना राही हॉटेलमध्ये तरुण-तरुणींची मद्य पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री उशिरा हॉटेलवर छापा टाकला. छाप्यावेळी हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात पार्टी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी कारवाई करत मद्यधुंद अवस्थेतील दहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये पाच तरुणींचा समावेश असून त्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या पोलिस कारवाईमुळे हॉटेलमधील ग्राहकांची एकच धावपळ उडाली. या प्रकरणी हॉटेल चालकासह संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नियमांचे उल्लंघन झाले याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news