Sangli News : चार रोड स्वीपर वाहने धूळ खात उभी

कागदपत्रांची पूर्तता, हस्तांतर बाकी; रस्त्यांची नियमित साफसफाई कधी सुरू होणार?
Sangli News
सांगली : वापराच्या प्रतीक्षेत धूळ खात उभे असलेले रोड स्वीपर.
Published on
Updated on

सांगली : महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियानांतर्गत सांगली महानगरपालिकेला चार अत्याधुनिक रोड स्वीपर वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ही वाहने शहरातील शाळा नं. ६ च्या मैदानावर गेले महिनाभर तशीच उभी आहेत. काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप बाकी असल्याने ही वाहने आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. तसेच वाहनांची तांत्रिक चाचणी (ट्रायल) देखील अद्याप झालेली नाही. परिणामी लाखो रुपयांची ही यंत्रसामग्री वापराअभावी धूळ खात उभी आहे.

महापालिकेला यापूर्वीही शासनाने दोन रोड स्वीपर वाहने उपलब्ध करून दिली होती. मात्र त्यांचा प्रभावी आणि नियमित वापर होत असल्याचे चित्र दिसत नाही. अशातच आणखी चार नवीन वाहने मिळाल्याने निदान आतातरी शहरातील रस्त्यांची स्वच्छता अधिक सक्षम होईल, रस्त्यांवरील धुळीचा त्रास वाहनधारक, नागरिकांना होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु ही वाहने प्रत्यक्ष रस्त्यावर कधी उतरणार हा प्रश्न आहे.

कोट्यवधींची यंत्रणा; वापर कधी?

शासनाकडून उपलब्ध करून दिलेली रोड स्वीपर वाहने रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि सूक्ष्म घाण साफ करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. त्यामुळे त्याचा वापर होणे गरजेचे आहे. अत्याधुनिक रोड स्वीपर हे हेवी वाहन प्रकारात मोडते. त्यामुळे हे वाहन चालविण्यासाठी हेवी वाहन चालविण्याचा परवाना असलेले वाहनचालक उपलब्ध करावे लागतील, अन्यथा नवीन नियुक्ती करावी लागेल. त्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news