Sangli Accident : नांगोळेजवळ अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

दुचाकीची थांबलेल्या डंपरला धडक : तरुणी गंभीर जखमी
Sangli Accident News
नांगोळेजवळ अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-नांगोळे मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक मधुकर गणपती नरळे (वय ६४) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची भाची स्वाती खोत (१७) गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी (दि. २६) रात्री उशिरा घडला.

कवठेमहांकाळ-नांगोळे रस्त्यावर बसव केमिकल फॅक्टरीसमोर रस्त्याच्या कडेला एक डंपर बंद अवस्थेत उभा होता. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मधुकर नरळे हे भाची स्वाती खोत हिला घेऊन शिवाजीनगरकडे निघाले होते. अंधारामुळे त्यांना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरचा अंदाज आला नाही. त्यांची दुचाकी डंपरवर पाठीमागून जोरात आदळली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मधुकर नरळे यांचे निधन झाले.

मधुकर नरळे हे पिंपळवाडी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. माजी सैनिक असलेल्या नरळे यांनी निवृत्तीनंतर गावात स्वच्छता मोहीम, सामाजिक उपक्रम आणि शिस्तीसाठी नेहमीच पुढाकार घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news