Sangli Accident : जुनोनीजवळ भीषण अपघातात पलूसमधील माय-लेकाचा मृत्यू

समोरील वाहनाचा टायर फुटल्याने अपघात; दोघे गंभीर जखमी
Sangli Accident News
जुनोनीजवळ भीषण अपघातात पलूसमधील माय-लेकाचा मृत्यू
Published on
Updated on

पलूस : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पलूस शहरातील तरुण उद्योजक आणि त्यांच्या आईचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कुटुंबातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पलूस शहरासह परिसरात शोककळा पसरली.

संदीप चिंतामणी भोसले (वय 28) आणि त्यांच्या आई रेखा चिंतामणी भोसले (वय 52, रा. एमआयडीसी परिसर, पलूस) अशी अपघातात मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पलूस येथील व्यावसायिक संदीप भोसले हे सोमवारी आपल्या कुटुंबासह सासरवाडीहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी मोटारीतून (क्र. एमएच 10 डीक्यू 0670) निघाले होते. या वाहनात वाहनामध्ये आई, पत्नी, भाऊ, भावजय, लहान मुले असे कुटुंबातील एकूण आठ सदस्य होते.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुनोनी-चिकोडी गावादरम्यान त्यांच्या पुढे जाणाऱ्या मोटारीचा (क्र. एमएच 43 एजे 3447) टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पाठीमागून जाणाऱ्या संदीप भोसले यांच्या मोटारीची समोरील मोटारीस जोरदार धडक बसली. धडकेनंतर भोसले यांची महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूस फेकली गेले. ही धडक इतकी भीषण होती की, भोसले यांची मोटार महामार्गावर दोन ते तीन वेळा उलटली. या अपघातात चालक संदीप भोसले व त्यांची आई रेखा भोसले मोटारीबाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात संदीप यांचे मोठे बंधू अनिल भोसले यांच्या पत्नी विद्या भोसले (वय 29) गंभीर जखमी झाल्या. संदीप यांच्या पत्नी पूजा भोसले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. अपघाताची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news