Sangli News : घरपट्टी नोटिसांवर ७२५१ हरकती दाखल

हरकतींचा ओघ वाढला : १४४९ मालमत्तांची फेरतपासणी
Sangli Municipal Corporation
सांगली महानगरपालिकाPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : घरपट्टी नोटिसांवर गुरुवार, दि. ११ जूनअखेर ७२५१ हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींचा ओघ वाढला आहे. दरम्यान, ३९३७ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. सांगलीत मंगलधाम प्रशासकीय इमारत, कुपवाड व मिरज येथील प्रशासकीय कार्यालयात हरकतींवर सुनावणी घेतली जात आहे.

महापालिकेकडून २ लाख ८ हजार मालमत्तांपैकी १ लाख ४५ हजार मालमत्ताधारकांना भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या नोटिसा वितरित करण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर सूचना, हरकती दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. इमारतीचे मोजमाप चुकीचे, क्षेत्रफळ चुकीचे, करपात्र क्षेत्रफळ वाढल्याच्या मुद्द्यावर अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. याशिवाय उपयोगिता शुल्क, जलनि:सारण कर, रोहयो कर, महा शिक्षण कर, याबाबतही हरकती दाखल झालेल्या आहेत.

गुरुवारअखेर ७२५१ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सांगलीतून ३९७८, कुपवाडमधून १२३३, मिरजेतून २०४० हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींवर सुनावणी घेतली जात आहे. एकूण ३९३७ हरकत अर्जांवर सुनावणी झाली आहे. ८३९ हरकत धारकांनी नोटीसमधील घरपट्टी मान्य केली आहे. दरम्यान १ हजार ४४९ हरकतदारांच्या मालमत्तेची फेरतपासणी होणार आहे. इमारतीचे मोजमाप चुकीचे, क्षेत्रफळ चुकीचे, इमारतीचे वय चुकीचे, इमारतीच्या स्वरुपात बदल, अशा काही हरकती दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news