Sangli News : सांगलीत शिक्षिकेच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास

संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Burglary Case
सांगलीत शिक्षिकेच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपासFile Photo
Published on
Updated on

​सांगली : येथील बालाजीनगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चांदीचे पूजेचे साहित्य लंपास केले. या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजीनगरमधील आशादीप स्कूलजवळ राहणाऱ्या पूनम सुभाष देसाई (वय ३३, व्यवसाय: शिक्षक) या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांचे बंद घर चोरट्यांनी लक्ष्य केले. मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला. या प्रकरणी देसाई यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घरफोडीमध्ये चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे ६० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य चोरून नेले. यामध्ये गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीचे ताट, पेला, वाटी, समई आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. यासोबतच कपाटातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (चार मणी व दोन वाट्या) आणि १० हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news