Sangli Accident News: तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कवठेपिरान येथील घटना : मोटारचालकाने अचानक दरवाजा उघडल्याने ट्रकखाली सापडला
Sangli Accident News: तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
(File Photo)
Published on
Updated on

सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मोटार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने मोटारीच्या दरवाजास धडकून रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या ट्रकखाली सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. 12 रोजी सकाळी कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर घडली. ओंकार श्रीधर लोखंडे (वय 24, रा. खणभाग, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ श्रीधर लोखंडे (रा. खणभाग, सांगली) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती अशी, फिर्यादी सौरभ यांचा भाऊ ओंकार हा घरगुती बिस्किटे विक्रीचा व्यवसाय करीत होता. बुधवारी सकाळी तो दुचाकीवरून (क्र. एमएच 10 डीवाय 2461) पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे निघाला होता. यादरम्यान कवठेपिरान येथील मुख्य रस्त्यावर हणमंत आप्पा परियावर (रा. व्हंकलकुंड, ता. गुलबर्गा, जि. कोप्पाळ, रा. कर्नाटक) याने मोटार (एमएच 09 एफव्ही 5109) उभी केली होती.

ओंकार दुचाकीवरून या मोटारीजवळ आला असता, चालक परियावर याने अचानक मोटारीचा दरवाजा उघडला. त्यामुळे ओंकार दरवाजाला धडकून रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी दुधगावकडून कवठेपिरानकडे वेगाने येणाऱ्या ट्रकची (एमएच 09 इएम 6273) त्यास जोरदार धडक बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक तात्यासाहेब भूपाल चौगुले (वय 62, रा. दुधगाव, ता. मिरज) आणि मोटारचालक हणमंत परियावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news