Sangli Crime : बागणीतील पर्स चोरीचा छडा; महिलेला अटक

३ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

​आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथील एसटी स्टॅण्डवरून महिलेची सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स चोरणाऱ्या चोरट्या महिलेला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. विमल अनंत काळे (वय ४५, रा. वारणाली, सांगली, सध्या रा. हातकणंगले) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत सविता भरत खरात (वय ४१, रा. कमळापूर, ता. खानापूर) यांनी आष्टा फिर्याद दाखल केली आहे.

सविता भरत खरात या १३ जुलै रोजी भावाला भेटण्यासाठी जात असताना, बागणी एसटी स्टॅण्डवर त्यांची पर्स चोरीला गेली होती. यामध्ये १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १ लाख ५० हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस आणि २० हजार रुपये रोख रक्कम होती. ​गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमर कोरडे व पथक गस्त घालत होते. पोलिसांनी सापळा रचून संशयित विमल काळे हिला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news