Sangli Crime : चुलत्याच्याच घरात चोरी; पुतण्या जेरबंद

जत तालुक्यातील बिळूर येथील प्रकार : नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

सांगली : बिळूर येथे घराचा कडी-कोयंडा उघडून चुलत्याच्या घरात घरफोडी करणाऱ्या पुतण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी (वय ३०, रा. डोणीपीर वस्ती, बिळूर, ता. जत) असे त्याचेे नाव असून, त्याच्याकडून ८ लाख ८१ हजार २९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

बिळूर येथील प्रशांत घेज्जी हा चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी जत-कवठेमहांकाळ रस्त्यावरील जाधव वस्तीजवळील बंद हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्या पँटच्या खिशात सोन्याच्या साखळ्या, झुमके, अंगठी, गंठण आणि चांदीचे दागिने आढळून आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रशांतची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चुलते रावसाहेब बाबू घेज्जी हे घरात नसताना कडी उघडून स्वयंपाकघरातील डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रक्कम चोरल्याचे त्याने सांगितले. रोख रक्कम त्याने खर्चासाठी वापरल्याचेही कबूल केले. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ७८ हजार ७९० रुपयांचे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने, असा एकूण ८ लाख ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयिताला न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news