Sangli Crime: नेलकरंजीत पिस्टलचा सौदा फसला

आटपाडी पोलिसांची कारवाई; तरुणास अटक
Sangli Crime: नेलकरंजीत पिस्टलचा सौदा फसला
Published on
Updated on

आटपाडी : नेलकरंजी ते भिवघाट मार्गावरील कालवा परिसरात देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला आटपाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

वैभव संपत माळी (वय २३, रा. ढवळे वेस, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ७३ हजार रुपये किमतीचे देशी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक अमोल खरात यांना नेलकरंजी कालव्याजवळ एक संशयित पिस्टल विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

दरम्यान, कालवा परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे मॅगझीनयुक्त पिस्टल आणि ७ एमएमची तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला अटक करून पिस्टल व काडतुसे जप्त करण्यात आली. न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news