

मिरज : कळंबी (ता. मिरज) येथे नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात कार उलटली. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे संजीव लक्ष्मण कासार यांनी निंगाप्पा महादेव कणमट्टी (वय ३७, रा. माधवनगर, मिरज) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निंगाप्पा कणमट्टी हा त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने घेऊन निघाला होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्ग दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे कार उलटली. या कारमध्ये असणारे जखमी झाले. तसेच महामार्गाचे नुकसान झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.