Sangli News : नांद्रेत समाजमंदिर बांधकामाच्या त्रासातून शेतकऱ्याने जीवन संपवले

तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

​सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे शासकीय समाजमंदिराच्या (अभ्यासिका) बांधकामावरून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून जीवन संपवले. गजानन बापू मदने (वय ४२) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबररोजी उघडकीस आली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात तिघा संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली गजानन मदने (वय ३९, रा. सिद्धार्थ चौक, नांद्रे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे पती गजानन मदने यांना ३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत तानाजी भुजंग मदने, दिलीप बाळासाहेब मदने आणि प्रदीप बाळासाहेब मदने (सर्व रा. नांद्रे) यांनी सतत मानसिक त्रास दिला. शासनामार्फत मंजूर झालेल्या शूरवीर बहिर्जी नाईक अभ्यासिकेचे बांधकाम फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील भिंतीला लागून सहा इंच जागा सोडून करण्यासाठी संशयितांनी त्यांच्यावर दबाव आणून दमदाटी केली होती.

या त्रासाला कंटाळून गजानन मदने यांनी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी नांद्रे-गंजीखाना रोडवरील शेतात करंजीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत संशयितांची नावे नमूद करून ते आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे म्हंटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news