Sangli municipal election: अतिआत्मविश्वास, गटबाजीची किंमत भाजपला मोजावी लागली

नेत्यांची बेरीज होऊन जागांची झाली वजाबाकी
Sangli Municipal Elections
Sangli Municipal ElectionsPudhari
Published on
Updated on
उध्दव पाटील

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 78 पैकी 39 जागा मिळवून सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचला असला तरी, स्वबळावर सत्ता स्थापनेचे त्यांचे स्वप्न मात्र भंगले आहे.

महानगरपालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवणाऱ्या भाजपसाठी यावेळचा निकाल इशारादायक मानला जात आहे. अतिआत्मविश्वास, नेत्यांमधील गटबाजी, जागावाटपात झालेला घोळ यामुळे भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. राष्ट्रवादीचा प्रयोग मिरजेत साधला असला तरी, सांगलीत मात्र भाजपला नडला. भाजपने शिवसेनेला युतीबाहेर ठेवले, पण त्याच शिवसेनेने भाजपचा सत्तेचा मार्ग रोखल्याचेही दिसून आले.

65 प्लसचा दावा अन्‌‍ 39 जागा

महापालिका निवडणुकीपूर्वी आणि ऐन निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली. भाजपचे उमेदवार निवडताना पक्ष म्हणून उमेदवार निवडण्याऐवजी पक्षातील प्रत्येक गटाला जागा वाटप झाले. त्यामुळे विनिंग मेरिटमध्ये मागे असलेले काहीजण उमेदवार म्हणून निवडले. पक्षात बंडखोरीही मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. सहा महिन्यांपूर्वी 65 प्लस जागांवर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपने ऐन निवडणुकीत 45 प्लसचा दावा केला. जागांचा दावा का बदलला, यातच सर्वकाही इंगित आहे. भाजपमध्ये गटबाजी नसती व नेतेमंडळी टीम बीजेपी म्हणून या निवडणुकीत लढली असती, तर भाजप स्वबळाबर सत्तेत आला असता, 39 हून अधिक जागा मिळाल्या असत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news