

सांगली : शहरातील प्रभाग क्र. 17 हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळच्या निवडणुकीतही ही ओळख अधिक ठळकपणे समोर येत आहे. सध्या या प्रभागात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात भाजप आघाडीवर आहे. संपूर्ण परिसर भाजपमय झाला आहे. प्रत्येक गल्ली-बोळात, प्रत्येक चौकात आणि घरा-घरांत भाजपाच्या विजयाचा निर्धार होऊ लागला आहे, अशी माहिती ज्येष्ठ उद्योजक राजेंद्रसिंह पाटील यांनी दिली.
भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोकहितकारी कामगिरीवर सर्वसामान्य नागरिकांचा ठाम विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्र. 17 मधील नागरिक मोठ्या संख्येने भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भाजपचा प्रचार जोशात आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे-पाटील, मालन गडदे आणि प्रशांत पाटील यांचा प्रचार वेगाने आणि प्रभावीपणे सुरू आहे. लोकांशी थेट संवाद, विकासाची ठोस हमी आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे भाजपाची आघाडी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत असल्याचे राजेंद्रसिंह पाटील यांनी सांगितले.
भाजपच्या प्रचाराअंतर्गत दत्तनगर, कुंटे मळा, धनंजय हाऊसिंग सोसायटी, मंगलमूर्ती कॉलनी, गुलमोहर कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, प्रगती कॉलनी, निशांत कॉलनी, मधुबन कॉलनी, शांतिसागर कॉलनी धामणी रोड, शांतिसागर कॉलनी 100 फुटी आदी परिसरात भाजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला वर्ग, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः भाजपाबद्दल सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. घरा-घरांतून, गल्ली-बोळांतून पूर्णपणे भाजपचाच असा सूर उमटत आहे. प्रभाग क्र. 17 मध्ये भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच प्रभाग क्र. 17 मध्ये भाजपाचा प्रचार हा केवळ निवडणूक प्रचार न राहता, जनतेचा विश्वास आणि विकासाची ग्वाही ठरत आहे. येणाऱ्या निकालात भाजपाची भक्कम आघाडी आणि निर्णायक विजय स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास नागरिकांना असल्याचे राजेंद्रसिंह पाटील यांनी सांगितले.