Sangli Municipal Corporation: 35 लाखांच्या कामाच्या बिलाची फाईल गायब

महानगरपालिकेतील कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महानगरपालिकेतील कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत गॅस आणि रिलायन्स जिओ यांनी केलेल्या रस्ते खोदाईनंतर चरी दुरुस्तीच्या कामासाठी सादर केलेल्या 35 लाख रुपयांच्या बिलाची नस्तीच महापालिकेच्या लेखा विभागातून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराने थेट आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

महापालिका क्षेत्रात भारत गॅस व रिलायन्स जिओकडून करण्यात आलेल्या खुदाईनंतर रस्ते व चरी दुरुस्तीचे काम सन 2022-23 मध्ये पूर्ण करण्यात आले होते. या कामाचे रनिंग बिल सर्व कागदपत्रांसह नियमित प्रक्रियेनुसार तयार करून महापालिकेच्या लेखा विभागाकडे सादर करण्यात आले होते. हे बिल 35 लाख रुपयांचे आहे.

मात्र संबंधित बिलाची फाईल लेखा विभागात सापडत नसल्याचे समोर आले आहे. कार्यालयात सर्वत्र शोधाशोध करूनही संबंधित कागदपत्रे मिळाली नसल्याने ठेकेदाराने आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. लाखो रुपयांच्या बिलाची कागदपत्रेच हरवणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news