Sangli News : सर्किट हाऊस रस्त्यावरील अतिक्रमणे पाडली

महापालिकेची कारवाई; संरक्षक भिंती, बांधकामे हटवली
Sangli News
सर्किट हाऊस रस्त्यावरील अतिक्रमणे पाडली
Published on
Updated on

सांगली : माधवनगर रस्त्यालगत टीव्हीएस शोरूम ते सर्किट हाऊसदरम्यानच्या रस्त्यावर अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. अनेक ठिकाणच्या संरक्षक भिंती, अन्य बांधकामे हटवण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने ही कारवाई केली.

महापालिकेच्या विकास योजनेत हा रस्ता 80 फूट रुंदीचा आहे. सध्या हा रस्ता 43 फूट रुंदीने आहे. रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतूक आणि नियोजनात अडथळे निर्माण होत होते. नगररचना विभागाने संबंधित मिळकतधारकांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शनिवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रत्यक्ष कारवाई केली. एक औषध विक्रीचे दुकान, तीन घरांचे काही भाग, पाटीदार भवनसमोरील संरक्षक भिंत तसेच काही खासगी इमारतींसमोरील संरक्षक भिंती हटवण्यात आल्या. महसूल सांस्कृतिक भवनाच्या संरक्षण भिंतीवरही कारवाई होणार होती. मात्र संबंधितांना नोटीस न मिळाल्याने त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे महानगरपालिकेकडून त्यांना नोटीस बजावून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख नागार्जुन मद्रासी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. नवीन भिंत उभारण्यासाठी मंजुरीस कालावधी लागणार असल्याने पंधरा दिवसांची मुदत देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. त्यामुळे सर्किट हाऊसच्या संरक्षक भिंतीवरील कारवाई टळली. महापालिकेच्या या कारवाईमुळे रस्त्याच्या नियोजित रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news