Sangli: महानगरपालिकेचे ३७ कर्मचारी निलंबित

तीन महिन्यांहून अधिक काळ गैरहजर : आयुक्तांचा दणका, विभागीय चौकशी सुरू
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : नव्वद दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर असल्याने महापालिकेकडील ३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजीता महापात्र यांनी ही कारवाई केली. या ३७ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात निलंबन कारवाईचे हे नवे रेकॉर्ड आहे.

महापालिकेच्या सर्व चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वॉर्ड मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि सहायक आयुक्तांमार्फत हजेरी मस्टरची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दीर्घकाळापासून गायब असलेले कर्मचारी निदर्शनास आले. क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत- ८, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत- १२, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत- ६ आणि क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत- २, असे एकूण २८ सफाई कर्मचारी ९० दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर आहेत.

आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन आणि पाणी पुरवठा या अत्यावश्यक सेवा आहेत. हे कर्मचारी दीर्घकाळ विनापरवाना गायब राहिल्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये कचरा आणि पाण्याच्या तक्रारी वाढत होत्या. निलंबन काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला इतर ठिकाणी खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. दरमहा ३० तारखेच्या आत तसे 'स्वयं-प्रमाणपत्र' सादर केल्याशिवाय पुढील महिन्याचा उदरनिर्वाह भत्ता मिळणार नाही. महापालिकेचे साहित्य ताबडतोब हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news