Sangli municipal corporation: पदाधिकारी, गटनेते, स्थायी सदस्यांना लॉटरी

महापालिका बजेटमध्ये 26.80 कोटींची तरतूद : नगरसेवकांच्या आशा महापौरांवर
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, गटनेते, स्थायी समिती सदस्यांसाठी 26.80 कोटी रुपये विकास निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते वगळता अन्य पदाधिकारी, गटनेते, स्थायी समिती सदस्य खूश होते. दरम्यान, विकास निधीत नगरसेवकांचा समावेश नाही. त्यांच्या आशा आता महापौरांवर आहेत. अर्थसंकल्प अंतिम करण्यापूर्वी नगरसेवक विकास निधीची तरतूद होईल, असे संकेत मिळत आहेत.

स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी शुक्रवारी महासभेत महापालिकेचा 2026-27 चा 1173 कोटी जमा व 1126 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात 108 कोटींची भर घालून सभापती माने यांनी अर्थसंकल्प महासभेत सादर केला.

दरम्यान, या अर्थसंकल्पात विविध योजना, कामे, उपक्रमांसाठी तरतूद केलेली आहे. पदाधिकारी, गटनेते, स्थायी समिती सदस्यांना विशेष विकास निधीचीही तरतूद केली आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांना 4.50 कोटी, उपमहापौर गजानन मगदूम यांना 2 कोटी, स्थायी समिती सभापती अतुल माने यांना 4 कोटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना 2 कोटी, सभागृह नेते संदीप आवटी यांना 1.50 कोटी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांना 1.50 कोटी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांना 25, तर शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांच्यासाठी 25 लाख रुपये, याप्रमाणे विकास निधीची तरतूद केली आहे.

स्थायी समितीमधील 15 सदस्यांसाठी प्रत्येकी 72 लाख रुपये विकास निधीची तरतूद केली आहे. दरम्यान, नगरसेवकांनाही स्थानिक विकास निधीची तरतूद करावी, अशी मागणी पुढे आली. त्यांच्या आशा आता महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यावर आहेत. अर्थसंकल्प अंतिम करताना तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news