Sangli Water Supply : महापालिका क्षेत्रात आज पाणी पुरवठा बंद

महावितरण-महापालिका समन्वयाचा अभाव; पाणीपुरवठा विस्कळीत
Water supply
Water supply file photo
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिका क्षेत्रात मंगळवारी वीजपुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद राहणार आहे. वीज कंपनी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करत असल्याने याचा थेट फटका महापालिकेच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे.

वीज कंपनी आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. सध्या २५ टक्क्यांहून अधिक पाणीकपात आणि ३५ टक्क्यांहून अधिक पाणीगळती असे चित्र आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने अधिकृत १० टक्के पाणीकपात सुरू केली असली, तर प्रत्यक्षात तुटीमुळे ही कपात अधिकच भासत आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे वीज कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे मंगळवारी महापालिकेच्या टाक्या भरू शकणार नसल्याने पाणीपुरवठा होणार नाही, तर बुधवारीही अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. या गोंधळाची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी तत्काळ आढावा घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news