Sangli : बेळोंडगीत शेत तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

मुलीला वाचविताना आईचाही दुर्दैवी अंत
Sangli News
बेळोंडगीत शेत तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू
Published on
Updated on

जत : बेळोंडगी (ता. जत) येथे खेळत असताना दोन वर्षांची मुलगी शेत तलावात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आईही तलावात पडली. पाण्याबाहेर पडता न आल्याने माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. 20 रोजी दुपारी घडली. कावेरी आनंद संबर्गी (वय 20), लक्ष्मी आनंद संबर्गी (2) अशी या माय-लेकीची नावे आहेत.

बेळोंडगी येथे कावेरी संबर्गी यांच्या घराशेजारी शेत तलाव आहे. बुधवारी दुपारी त्यांची मुलगी लक्ष्मी खेळत खेळत तलावातील पाण्यात पडली. हे पाहून आई कावेरी पोहता येत नसतानाही तिला वाचविण्यासाठी तलावात उतरली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलीसपाटील वैशाली पुजारी यांनी उमदी पोलिसात माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक दिनेश दसाडे हे घटनास्थळी दाखल झाले. शेततलावातून माय-लेकीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तपास उपनिरीक्षक दिनेश दसाडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news