Miraj Rain : मिरज पूर्व भागात वादळाचा तडाखा

बेळंकीत दुकान वादळाने उलटले, आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान
मिरज पूर्व भागात वादळाचा तडाखा
मिरज पूर्व भागात वादळाचा तडाखा
Published on
Updated on

लिंगनूर/बेडग : मिरज पूर्व भागात आज सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. जोराच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडणे, घराचे पत्रे उडणे, कौले उडणे असे अनेक प्रकारचे नुकसान आज सायंकाळी झालेल्या वाढली वाऱ्यासह पावसात झाले आहे.

बेळंकी येथे तर बस स्थानक परिसरात एक दुकानच थेट उलटले आहे. त्यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.लिंगनूर, खटाव, जानराववाडी, बेळंकी, सलगरे, चाबूकस्वारवाडी, शिपूर, एरंडोली, विकासनगर, कदमवाडी यांसह पूर्व भागात वादळाने तडाखा दिला आहे. सर्वाधिक नुकसान काढणीला आलेल्या केशर जातीच्या व अन्य जातीच्या तसेच गावरान आंब्याच्या झाडाना बसला असून आंब्याच्या बागेत पडलेल्या आंब्यांचा खच दिसुन येत आहे. ऐंशी टक्के झाड रिकामे झाले असून आंबा पिकाचा सुपडा साफ झाला असून मोठे आर्थिक नुकसान आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news