Sangli Accident : बालगाव पुलावर भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, दोघे जखमी

उमदी पोलिसात गुन्हा दाखल
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

जत : बालगाव (ता. जत) गावच्या पुलावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फिर्यादी कुत्ताप्पा कल्लाप्पा कोडगोळी (वय 27, रा. कंकनकाल, ता. बसवन बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) हे सिमेंट बलकर ट्रक (क्रमांक केए 50 बी 5589) घेऊन जात होते. त्याच वेळी समोरून येणारा ट्रक (क्रमांक एनएल 01 एन 7433) भरधाव वेगात आला आणि त्याने कोडगोळी यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली.

या अपघातात समोरून येणाऱ्या ट्रकचा चालक धर्मेंद्रसिंह (वय 35, रा. बदायूं, उत्तर प्रदेश) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तसेच फिर्यादी कुत्ताप्पा कोडगोळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली आहे. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), 324(2) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news