Sangli : अल्पवयीन गर्भवती मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अत्याचारप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Sangli Crime News
अल्पवयीन गर्भवती मुलीचा उपचारादरम्यान मृत्यूFile Photo
Published on
Updated on

तासगाव : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन गर्भवती मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अत्याचारप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संबंधित पीडित मुलगी ही 17 वर्षाची आहे. तिच्यावर अज्ञाताने 29 आठवड्यापूर्वी अज्ञात ठिकाणी लैंगिक अत्याचार केला होता. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. सोमवारी तिला त्रास होऊ लागल्याने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान पीडित मुलीची तपासणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली. अधिक उपचारासाठी पीडितेला सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तासगाव पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बदने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news