

सांगली ःयेथील अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित सद्दाम बशीर बोजगर (रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दि. 3 जुलै 2025 रोजी संशयित सद्दाम बोजगर याने तरुणीला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. तिला सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर नेले. तेथे शीतपेयातून तिला गुंगीचे औषध प्यायला दिले. गुंगी आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने असे कृत्य वारंवार केले. त्याचबरोबर आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. संशयिताने अत्याचारावेळी व्हिडीओ चित्रण केले होते. ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती.