Sangli Crime : सांगलीत परप्रांतीय ठेकेदाराचा खून

पत्नीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून कृत्य
Sangli Crime News
सांगलीत परप्रांतीय ठेकेदाराचा खून
Published on
Updated on

सांगली : राजस्थानातून फरशी फिटिंगच्या कामासाठी बोलावून घेतलेल्या मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय ठेकेदाराचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोपालसिंह बेगाराम भदाला (वय 35, मूळ रा. गोविंदपुरा, ता. रिंगस, जि. शिखर, राजस्थान, सध्या रा. हनुमान मंदिरमागे, लक्ष्मीनगर, शांतिनिकेतनजवळ, सांगली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.दरम्यान या प्रकरणातील संशयित प्रेमकुमार पवनकुमार बराला (रा. जेटुसरा, ता. श्रीमाधवपूर, जि. शिखर, राजस्थान) हा पत्नीसह पसार झाला आहे. संजयनगर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मृत भदाला हा फरशी फिटिंगची कामे घेतो. साखर कारखान्यासमोरील हनुमान मंदिरमागे संदीप पवार यांच्याकडे तो भाड्याने राहत होता. त्याच्या ओळखीच्या प्रेमकुमार याने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. त्यानंतर त्याने कामासाठी म्हणून गोपालसिंह याच्याशी संपर्क साधला. तेव्हा गोपालसिंह याने त्याला सांगलीत बोलावून घेतले. चार दिवसांपूर्वी प्रेमकुमार पत्नीसह सांगलीत आला. गोपालने तो राहत असलेल्या खोलीसमोरच त्यांना खोली घेऊन दिली. त्यानंतर दोघे फरशी फिटिंगची कामे करू लागले. गोपालसिंहची पत्नी गावाकडेच आहे. सांगलीत आलेल्या प्रेमकुमारची पत्नी पाहून तिच्याकडे वाईट नजरेने तो पाहू लागला. तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने पती प्रेमकुमार याला हा प्रकार सांगितला. ते ऐकून तो संतप्त झाला. त्याने खरसुंडी (ता. आटपाडी) येथे राहणाऱ्या गोपालसिंहच्या भावाला हा प्रकार सांगितला.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रेमकुमारने खोऱ्याने गोपालसिंह याच्या डोक्यात व कानाजवळ वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन पडला. त्यानंतर पत्नीला घेऊन प्रेमकुमार पसार झाला. गोपालसिंहचे घरमालक पवार यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु वर्मी घाव बसल्यामुळे जखमी झालेल्या गोपालसिंह याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.

मृताकडे मोठी रोकड

गोविंदसिंह याने कामाच्या ठिकाणावरून उचल घेतली असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्याच्याकडे पाच ते साडेपाच लाखांची रोकड व दोन तोळ्यांची सोन्याची साखळी होती, अशी माहिती मिळाली आहे. रोकड घेऊन संशयित पसार झाला नाही ना? हे तपासात निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news