Sangli News : म्हैसाळच्या पाण्याने कमंडलू पात्र खळखळले

आ. रोहित पाटील यांचा पुढाकार ; कवठेमहांकाळसह ग्रामीण भागाला दिलासा
Mhaisal Water Scheme
म्हैसाळच्या पाण्याने कमंडलू पात्र खळखळले
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळसह परिसरातील गावांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार रोहित पाटील यांनी पावले उचलली. त्यांच्या सूचनेनुसार म्हैसाळ योजनेचे सोडण्यात आले असून, यामुळे कवठेमहांकाळ शहरातील कमंडलू नदीपात्र आता खळखळू लागले आहे. या निर्णयामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली असून, लगतच्या तीन ते चार गावांमधील शेतीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

कवठेमहांकाळ शहराला पुलाखालील सरकारी विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे या विहिरीतील पाण्याने तळ गाठला होता. परिणामी अनेक प्रभागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रियांका गेंड यांनी विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव आणि लोणारवाडी परिसरातील अग्रणी वरील बंधारे म्हैसाळच्या पाण्यातून भरून देण्याची मागणी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार रोहित पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने जाधववाडी येथील गेटमधून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. जाधववाडी येथून सोडण्यात आलेले पाणी कमंडलू नदीपात्रात पोहोचल्याने शहरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असून पाणीप्रश्न सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news