Sangli News| दुष्काळात म्हैसाळचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात दाखल; शेतकऱ्यांना दिलासा

कुकटोळीपासून बोरगावमार्गे पाणी पुढे रवाना
Sangli News
दुष्काळात म्हैसाळचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात दाखल
Published on: 
Updated on: 

कवठेमहांकाळ : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवार, दि. १७ रोजी रात्री कवठेमहांकाळ तालुक्यात दाखल झाले. काही महिन्यांपासून बंद असलेली ही योजना पुन्हा सुरू झाल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुकटोळी येथून कालव्यात पाणी सोडण्यात आले असून, बुधवारी सकाळी बोरगावपर्यंत पाणी पोहोचले आहे.

म्हैसाळ योजनेचा पाचवा टप्पा सलगरे गावच्या हद्दीत आहे. कोंगनोळी, कुकटोळी आणि बेळंकी या गावांच्या मध्यभागातून योजनेचे पाणी पुढे नेले जाते. कुकटोळी येथून कालव्यात पाणी दाखल झाल्यानंतर पुढील गावांकडे त्याचा प्रवास सुरू होतो. या आवर्तनातून थेट जत तालुक्याच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिकांना पाणी मिळण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.