Sangli Crime: मतिमंद मुलीवर बलात्कार; संशयिताला गुजरातमधून अटक

तासगाव पोलिसांची धडक कारवाई
Sangli Crime: मतिमंद मुलीवर बलात्कार; संशयिताला गुजरातमधून अटक
Published on
Updated on

तासगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन सातत्याने बलात्कार केल्याबद्दल व त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याबद्दल तासगाव पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात संशयिताला गुजरात राज्यातील फतेपुरामधून अटक केली. प्रदीप जगदीश सिंह (वय २५, रा. अमरसिंह का पुरवा, जगनपूर, जि. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.

तासगाव शहरात ४ दिवसांपूर्वी १३ वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. पीडिता मतिमंद असल्याने ती संशयिताबद्दल काहीच सांगू शकत नव्हती. दरम्यान पीडितेच्या घरातील एका सदस्याच्या मोबाईलवर संशयित फोन किंवा मेसेज करून तिला बाहेर बोलावून घेत असायचा. हाच धागा पकडून तासगाव पोलिसांनी मोबाईल नंबर शोधून त्याचे लोकेशन ट्रेस केले. यावेळी त्याच्या नावासह पत्ताही मिळाला. प्रदीप जगदीश सिंह असा हा २५ वर्षीय संशयित असून तो वेगवेगळ्या राज्यात जाऊन गॅस शेगडी, बकेट विक्री करत असतो तसेच सध्या तो राजस्थान बॉर्डरजवळ गुजरातमध्ये फतेपुरा येथे असल्याचे समजले.

उपअधीक्षक किरण अवचर, निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक पाटील, अमर सूर्यवंशी, सूरज जगदाळे, नीलेश डोंगरे यांनी या ठिकाणी जाऊन प्रदीप सिंह याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तपास उपनिरिक्षक प्रियांका माने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news