Sangli News : मासाळवाडीत दोन गटात हाणामारी

विहिरीच्या पाण्याच्या वादातून घटना ः आटपाडी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी
Group Fight
दोन गटात हाणामारी
Published on
Updated on

आटपाडी ः मासाळवाडी (ता. आटपाडी) येथे सामायिक विहीर मुजवण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल असून आटपाडी पोलिसात दहाजणांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याप्रकरणी रोहित सदाशिव पुकळे (वय 26, रा. मासाळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत दादासाो महादेव पुकळे, महादेव बाबा पुकळे व संगीता दादासाो पुकळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरासमोर समायिक विहीर मुजवण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी रोहित पुकळे यांच्या पत्नी गायत्री यांना मारहाण केली. तसेच लाकडाने त्यांच्या वडिलांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आईच्या उजव्या गालावर दगड मारून जखमी केले. तसेच फिर्यादी रोहित यांच्या डोक्यातही लाकडाने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिविगाळ, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

संगीता दादासाो पुकळे (वय 30, रा. मासाळवाडी) यांच्या फिर्यादीनुसार सदाशिव बाबा पुकळे, रोहित सदाशिव पुकळे, गायत्री रोहित पुकळे, शालन सदाशिव पुकळे व राजू तुकाराम पुकळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घराजवळ सामायिक विहीर मुजवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपींनी शिविगाळ करत काठी व दगडाने मारहाण केली. फिर्यादीचे पती दादासाो पुकळे यांच्या डोक्यात, हातावर व पायावर काठीने मारहाण करण्यात आली. तसेच सासरे महादेव पुकळे यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून काठीने जखमी करण्यात आल्याचे म्हटले आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी संगीता पुकळे यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली, तर पाठीत दगड मारून जखमी केल्याचा आरोप आहे. यावेळी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news